श्री.भवानी संग्रहालय, औंध (जि.सातारा)

कै.श्रीमंत भवानराव उर्फ बाळासाहेब महाराज पंतप्रतिनिधी (औंधचे राजे )हे उत्तम कलाप्रेमी आणि स्वतः एक कलाकार होते.त्यांनी अनेक कला चित्रांचा,शिल्पकलेच्या भांड्यांचा,शस्त्रास्त्रांचा आणि धार्मिक पुस्तकांचा संग्रह करून ठेवलेला आहे.सर्व सामान्य जनतेला या सर्वांचा फायदा व्हावा म्हणून त्यांनी सन १९३८ साली श्री.भवानी संग्रहालय व ग्रंथालयाची स्थापना केली.संग्रहालयात ८००० पेक्षा अधिक वस्तूंचा आणि १६००० पुस्तके त्यापैकी ३५०० धार्मिक पुस्तके(हस्तलिखित)आदींचा समावेशआहे.श्रीमंत बाळासाहेब महाराजांनी संग्रह्शास्त्राचा अभ्यास करून परदेशी वास्तुशास्त्रज्ञांच्या मदतीने नैसर्गिक सूर्यप्रकाश ,खेळती हवा आणि संरक्षण या गोष्टी विचारात घेऊन सध्याची संग्रहालयाची इमारत स्थापन केली.जिल्ह्यातील ग्रामीण भागांत इतक्या मोठ्या प्रमाणात विविध शिल्पांचे,आणि वस्तू संग्रहित करणे म्हणजे एक प्रकारे नवलच वाटण्यासारखे आहे. संग्रहालयाची निसर्गरम्य इमारत औंधच्या टेकडीच्या पायथ्याशी स्थित असून,सुप्रसिद्ध 'यमाई देवी'चे मंदिर टेकडीच्या माथ्यावर सुमारे ८०० फुट उंचीवर आहे.औंध हे उत्तम प्रकारच्या रस्त्यांनी जोडलेले असून  सातारा जिल्ह्यापासून ४३ किलोमीटर अंतरावर आहे. 

   ./../images/pant_pratinidhi.bmp (125814 bytes)  

<<<       औंधाचा राजा आणि औंध संग्रहालयाचा संस्थापक श्रीमंत भवानराव उर्फ बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांचा पुतळा 

 

 

जगप्रसिद्ध शिल्पकार 'हेनरी मुर 'यांनी बनविलेले भारतातील एकमेव 'बालक-माता' हि शिल्पवास्तू                                    > > >                                      

./../images/henry_moor.bmp (123534 bytes)

     ./../images/damyanti.bmp (151814 bytes)

< < <  दमयंती

 

  

  राजा रवि  वर्मा यांचे चित्र

 

 सैरंध्री  > > >

./../images/sairandhri-aundh.bmp (162454 bytes)

     ./../images/oleti_aundh.bmp (167966 bytes)

'रनिंग मर्क्युरी','कामदेव','अग्निदेव'इ.ब्राँझ पासून बनवलेली शिल्पे येथे प्रदर्शित केलेली आहेत.संग्रहालयाच्या आवारात भारतातील ६ ऋतूंची  शिल्पे इथे पहावयास मिळतात..

< < <  ठाकूरसिंग  यांचे प्रसिद्ध 'ओलेती 'हे चित्र 

राजा रवि वर्मा ,ठाकूरसिंग  'कर्निल','अन्द्रीडील','सोर्तोबार्दना','फ्रान्सीस गोया','चैरासी फ्रांक','इस्टमन ','मिस्त्रुथ' ,'जोनेस बेरो'इ.चा येथेसमावेश केलेला आहे.या संग्रहालयातील 'रोड टू पॅरिस','व्ह्युज ऑफ व्हिनस','बॉय व्हॉलटीअर ','सनसेट','फायनल मिल','मॉडेल्स ऑफ मोनालिसा','मदर-बेबी',आणि 'वर्जिन वुमन'ही काही सर्वोत्तम शिल्प आहेत.

                      ./../images/aundh_mus7.bmp (175086 bytes)

            बालक-माता   (मार्बल मध्ये )

अधिक छायाचित्रांसाठी इथे क्लिक करा.

संग्रहालयाच्या अधिक माहितीसाठी उप अभिरक्षकांना संपर्क साधा. फोन (०२१६१) २ ६२२२५. संग्रहालय पाहण्याची वेळ स.१०.०० ते दु.१.०० आणि दु.१.३० ते सायं. ५.०० सोमवारी सुट्टी.