सातारा जिल्ह्यातील धरणे 

 (पर्यटनाच्या दृष्टीकोनातून)

WB00939_1.GIF (1387
     bytes)

./../images/koyna_dam.bmp (264750 bytes)    कोयना धरण 
 • कोयना धरण 
हे धरण १९६३ साली कोयना नदीवर बांधलेले असून ९८.७८ टीएमसी क्षमता असलेले महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे.यावर १९२० मेगावॅट क्षमतेचा जल उर्जा प्रकल्प आहे. सातारा शहरापासून कोयना धरणापर्यंतचे अंतर ९८ कि.मी.आहे तर पाटण तालुक्यापासून हे अंतर २० कि.मी.आहे. सहलीसाठी उत्तम ठिकाण आहे. धरण क्षेत्रातील नेहरू उदयान प्रेक्षणीय आहे.

 

./../images/WB00939_1.GIF
     (1387 bytes)

./../images/khanher.bmp (225606 bytes)    कण्हेर धरण 
 • कण्हेर धरण 
१९८६ साली १०.१० टीएमसी क्षमता असलेले आणि प्रेक्षणीय असे हे धरण वेण्णा नदींवर बांधण्यात आले आहे. यावर ४ मेगावॅट क्षमतेचा जल उर्जा प्रकल्प आहे. सातारा-मेढा रस्त्याला सातारा शहरापासूनचे अंतर ८ कि.मी.आहे. येवतेश्वर  मंदिराच्या पुढे गेल्यानंतर या धरणाचे सौंदर्य अनुभवयास मिळते.

./../images/WB00939_1.GIF (1387 bytes)

./../images/dhom_dam1.jpg (8332 bytes)    धोम धरण 
 • धोम धरण 
 सन १९७८ मध्ये १३.५० टीएमसी क्षमतेचे हे धरण कृष्णा नदीवर बांधण्यात आलेले आहे. भेट देण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. यावर ४ मेगावॅट क्षमतेचा जल उर्जा प्रकल्प आहे. हे धरण सातारा शहरापासून ४४ कि.मी. (वाई पासून ९ कि.मी.) अंतरावर आहे. बोट क्लबची सुविधा येथे उपलब्ध असून पांचगणी येथील टेबल लँड वरून सुद्धा बोट क्लब व बोटिंगची  दृश्ये पहावयास मिळतात. मत्स्य संवर्धनाची कामे या ठिकाणी चालतात. 

 

./../images/WB00939_1.GIF (1387 bytes)