./../images/TR00243A.gif (2486 bytes) जिल्हा  दृष्टीक्षेपात

./../images/WB00939_1.GIF (1387 bytes)

सातारा जिल्हा हा महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील बाजूस स्थित  आहे .सातारा जिल्ह्याच्या उत्तरेला  पुणे , पूर्वेला सोलापूर ,दक्षिणेला सांगली  आणि पश्चिमेला रत्नागिरी जिल्हा व उत्तर-पश्चिमेला  रायगड जिल्हा आहे.
सातारा जिल्हा भीमा आणि कृष्णा नदींच्या  खोऱ्यामध्ये  वसलेला   आहे. हा जिल्हा विविध प्रकारच्या भूभागांनी बनलेला असून आल्हाददायक हवामान ,जंगले इ.चा परिणाम जिल्ह्याच्या भौतिक परिस्थितीवर  बघावयास मिळतो. सातारा  जिल्हा हा सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगा ,शिखरे आणि उंच पठारांनी वेढलेला आहे.या पर्वत रांगांची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे ४५०० फुट आहे.तसेच फलटण तालुक्यातील नीरा नदीच्या  खोऱ्या पासूनची उंची हि समुद्रसपाटीपासून १७०० फुटांपेक्षा जास्त आहे..हवामानाच्या बाबतीत महाबळेश्वर तालुक्याचा प्रभाग अधिक पाऊस पडणाऱ्या विभागात येतो.तेथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६००० मिमी असून   माण व खटाव चा विभाग हा कोरड्या क्षेत्रात येतो.व तेथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान हे ५०० मिमी आहे.जिल्ह्यातील पश्चिमेकडील बाजूस वैशिष्ट्यपूर्ण पावसाळी जंगले आहेत तर पूर्वेकडील इतर भूभाग हा  खुरट्या झुडपांनी व्यापलेला आहे. 
भौगोलिक स्थान  :   उत्तरेला १७.५ ते १८.११ अक्षांश
 :  पूर्वेला ७३.३३ ते ७४.५४ रेखांश 
भौगोलिक क्षेत्र  १०४८० (स्क्वे.कि.मी.)
हवामान किमान तापमान -११.६ डिग्री सेल्सिअस 
  कमाल तापमान - ३७.५  डिग्री सेल्सिअस
सरासरी पर्जन्यमान १४२६ मिमी 

./../images/WB00939_1.GIF (1387 bytes)

कोयना आणि कृष्णा या सातारा जिल्ह्यातील दोन प्रमुख नद्या आहेत. कृष्णा हि दक्षिण भारतातील तीन मोठ्या पवित्र  नद्यांपैकी एक आहे.कृष्णा नदीचा जवळपास १७२ किमी चा प्रवाह सातारा जिल्ह्यातून जातो.कृष्णा नदी महाबळेश्वरच्या पठारावरील पूर्वेकडील वरच्या भागात उगम पावते.        कुडाळी  ,उरमोडी,वेण्णा आणि तारळी या लहान नद्या कृष्णा नदीच्या मार्गावरील  उप   नद्या आहेत.कोयना ही कृष्णा नदीची जिल्ह्यातील प्रमुख उपनदी आहे. जिल्ह्याच्या उत्तर आणि उत्तर-पूर्वेकडील भागात नीरा आणि माणगंगा या भीमा नदीच्या जलसिंचनामध्ये  प्रमुख  मदत करणाऱ्या दोन उपनद्या  आहेत.

./../images/WB00939_1.GIF (1387 bytes)

सातारा जिल्ह्याचा नकाशा 

सातारा जिल्ह्याचा भौतिक नकाशा 

./../images/WB00939_1.GIF (1387 bytes)

जिल्हा परिषद  :  १ सातारा 
तहसील (११) :  १. सातारा २. कराड   ३.वाई  ४. महाबळेश्वर 
   ५. फलटण  ६.माण   ७. खटाव  ८. कोरेगांव 
  ९. पाटण   १०. जावली  ११. खंडाळा 
पंचायत समिती  (११) १. सातारा २. कराड   ३.वाई  ४. महाबळेश्वर 
   ५. फलटण  ६.माण   ७. खटाव  ८. कोरेगांव 
   ९. पाटण   १०. जावली  ११. खंडाळा 
तहसील ऑफिसेस (११) :   १.सातारा  २. कराड  ३. वाई  ४. महाबळेश्वर
   ५. फलटण  ६.माण   ७. खटाव  ८. कोरेगांव 
    ९. पाटण   १०. जावली  ११. खंडाळा 
नगर पालिका (८) :  १.सातारा  २. कराड  ३. वाई   ४. महाबळेश्वर 
   ५. पांचगणी   ६. रहिमतपूर   ७. फलटण 
   ८. म्हसवड 
नगर पंचायत   :   १ (मलकापूर )
टंचाई ग्रस्त तहसील   ४ (कोरेगांव ,खटाव,माण ,फलटण )
 • इतर माहिती 
ग्रामपंचायती  (गट  ग्रामपंचायती )   १,
शहरांची संख्या    १५
गावांची संख्या    १,७३९
वस्ती असलेली गावे   १,७१७
वस्ती  नसलेली गावे      २२
पोलिस ठाणी     ३४
पोलिस औटपोस्ट     २९
 • लोकसंख्या: (२००१ च्या जनगणनेनुसार )
ग्रामीण लोकसंख्या   २४ लाख ११ हजार 
शहरी लोकसंख्या  ०३ लाख  ९८ हजार 
एकूण   लोकसंख्या   २८ लाख   ९  हजार 
पुरुष   १४ लाख  ८  हजार
महिला   १४ लाख  ०१  हजार 
स्त्रिया प्रती हजार पुरुष     ९९५  
 • साक्षरता प्रमाण : (२००१)
एकूण   ७८.५२ %
पुरुष   ८८.४५ %
स्त्रिया   ६८.७१ %
राज्यात साक्षरता क्रमांक   १२ वा 
 • कृषी    (२०००-०१)
शेती:    हेक्टरमध्ये 
एकूण भौगोलिक क्षेत्र    १० लाख ५८ हजार
जंगलव्याप्त क्षेत्र   १ लाख ३८ हजार 
जंगलव्याप्त  क्षेत्राची भौगोलिक  क्षेत्राशी  टक्केवारी   १३.००  %
 • शेतीस उपलब्ध नसलेली जमीन 
बिगर शेती वापराखालील जमीन     २८ हजार 
पडीक आणि लागवडी लायक नसलेले क्षेत्र     ९३ हजार 
 • पडीक जमिनी व्यतिरिक्त लागवड न केलेली जमीन :
कायम गुरे चरण व  इतर    ७४ हजार 
झाडा-झुडापा खालील क्षेत्र      ६ हजार 
लागवडीयोग्य पण पडजमीन    ४२ हजार 
पडीत  जमीन : (अ) चालू पड     ५० हजार 
                        (ब)  इतर पड    ६९ हजार 
 • पिका खालील क्षेत्र:
पिका खालील निव्वळ  क्षेत्र  ५ लाख ५८ हजार
दुसोटा क्षेत्र     १ लाख ६३ हजार
एकूण पिकाखालील क्षेत्र   ७ लाख २१ हजार 
 • ओलिताखालील क्षेत्र: (२०००-०१
निव्वळ ओलीत क्षेत्र   १ लाख ७९ हजार 
एकूण ओलीत क्षेत्र   २ लाख ३२ हजार 
 • पशु संवर्धन :  (२००३ प्रमाणे )
एकूण पशुधन    १५ लाख ७९ हजार
गोवंश   ७ लाख ३० हजार 
म्हशी व रेडे  ३ लाख ६९ हजार 
मेंढ्या व शेळ्या  ८ लाख ३९ हजार 
कोंबड्या व बदके  २२ लाख २७ हजार
 • सहकार :  (२००६-०७)
एकूण सहकारी संस्था    ६,२७४
प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था ९४५
प्रा.कृ .स .संस्थांची सभासद संख्या ५ लाख ४७ हजार 
सहकारी दुग्ध संस्था  १३४४ 
प्राथमिक कृषी पतसंस्थांनी दिलेली कर्जे (कोटी रु.) ०.५९५४
 • जलसिंचन : (२००६-०७)
पाटबंधारे प्रकल्प व त्या खालील लाभक्षेत्र 
मोठे प्रकल्प  ७
मध्यम प्रकल्प     
दोन्ही प्रकल्पाचे लाभक्षेत्र     १ लाख ७३ हजार हेक्टर
सिंचन विहिरीखाली भिजणारे क्षेत्र   १ लाख १४ हजार हेक्टर
 • उद्योग : (२००५-०६)
नोंदणीकृत कारखान्यांची संख्या   ५१३
चालू असलेल्या नोंदणीकृत कारखान्यांची संख्या ३९४
साखर कारखान्यांची संख्या  (२००६-०७)   १२
साखर कारखान्यातील साखरेचे उत्पादन १५२ हजार मे.टन 
सहकारी सुत गिरण्यांची संख्या (२००६-०७) 
 • वीज :  (सन २००६-०७)
वीज पुरवठा केलेली शहरे व खेडी १,७३२
विद्युतीकरण झालेली गावे    १,७३२
वीज पुरवठा केलेले पंप्स संच १,०१,०६२
 • सार्वजनिक आरोग्य : (सन २००६-०७)
ग्रामीण रुग्णालये १८
दवाखाने १७
प्राथमिक आरोग्य  केंद्रे ७१
्राथमिक उपकेंद्रे ४००
प्राथमिक आरोग्य पथक  ६
 • शिक्षण : (२००६-०७)
प्राथमिक शाळा २,८६९
प्राथमिक शाळांतील विद्यार्थी संख्या  २,४६,३६७
प्राथमिक शाळांतील शिक्षक संख्या  १०,३०९
माध्यमिक शाळा    ७९३
उच्च माद्यामिक शाळा १३८
महाविद्यालये   ३८
 • परिवहन व दळण - वळण : (किमी मध्ये )
एकूण रेल्वे मार्ग लांबी १२४
बारमाही रस्त्यांनी जोडलेली गावे १,४५५
राष्ट्रीय महामार्ग लांबी १३०
राज्य महामार्गाची लांबी  ९८८
प्रमुख जिल्हा मार्ग लांबी    २,२८८
इतर जिल्हा मार्ग लांबी १,८३५
ग्रामीण रस्त्यांची लांबी ४,६८३
इतर रस्ते ५८१
एकूण रस्त्यांची लांबी     १०,५०५
 • आदिवासी कल्याणकारी योजना:
आदिवासी आश्रम शाळा        २
(त्यातील विद्यार्थी )   ४६३
 • मागासवर्गीय कल्याणकारी योजना:
मागासवर्गीयांसाठी वसतिगृहे १२
(त्यातील विद्यार्थी )   ९६०
 • सार्वजनिक वितरण व्यवस्था :(सन २००६-०७) 
रास्त भावाची दुकाने   १४६३
शासकीय गोदामे      २२
(साठवण क्षमता - हजार टनामध्ये )  १३
 • महत्वाची पिके :
भात, ज्वारी, बाजरी,गहू, मका, स्ट्रोबेरी , हरभरा ,ऊस ,कापूस, भुईमुग, घेवडा, सोयाबीन, बटाटा ,इ .

./../images/WB00939_1.GIF (1387 bytes)