सीमाचीन्हे (सातारा जिल्ह्यातील महत्वाच्या शैक्षणिक संस्था)  

./../images/WB00939_1.GIF (1387 bytes)

  महत्वाच्या शैक्षणिक संस्था

./../images/snk_school.jpg (17453 bytes) सैनिक स्कुल

  • सैनिक स्कुल सातारा 

सन १९६१ मध्ये राष्ट्रीय सुरक्षेचा धोका लक्षात घेऊन भारताचे तत्कालीन संरक्षण मंत्री व्ही.के.कृष्णमेनन आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.यशवंतराव चव्हाण यांनी दि.२३ जून १९६१ रोजी सैनिक स्कूल साताराची स्थापना केली. भारतातील एकूण १८ सैनिक स्कूल पैकी या सैनिक स्कूलची स्थापना सर्वात प्रथम झाली. हे सैनिक स्कूल सुरु करण्यामागचा मूळ उद्देश विदयार्थ्यांना राष्ट्रीय सुरक्षा दलासाठी आणि नौसेना दलासाठी प्रशिक्षण देणे हा आहे.आजपर्यंत यातील जवळपास ६०० विद्यार्थ्यांहून अधिक विदयार्थी सशस्त्र दलात सामील झाले आहेत. तसेच राष्ट्रीय सुरक्षा दलात या शाळेतून  जास्तीत जास्त विद्यार्थी पात्र होतात. या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे जीवनक्षेत्रच नव्हे तर त्यांचे आरोग्य आणि मन सबळ बनविले जाते.

./../images/WB00939_1.GIF (1387 bytes)

rayat.bmp (163254 bytes) रयत शिक्षण संस्था 

  • रयत शिक्षण संस्था   

ही राज्यातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्था असून डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील हे या संस्थेचे संस्थापक होते. संपूर्ण राज्यात या संस्थेच्या ६८९ शाखा असून ७१ वसतिगृहे आहेत. या संस्थेत के.जी.ते पदव्युत्तर पदवी पर्यंत विविध शाखांच्या माध्यमातून शिक्षण दिले जाते. सध्या या संस्थेत १७,३६३ कर्मचारी कार्यरत असून जवळपास ४.४२ लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

./../images/WB00939_1.GIF (1387 bytes)

vkosh_build.BMP (158394 bytes)      विश्वकोष,वाई             

   ./../images/tarkat.BMP (85746 bytes)          

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी (१९०१-१९९४)                         

  • मराठी विश्वकोष,वाई 

हे भारतातील  मराठी भाषेचे संशोधन आणि विकास करणारे एकमेव केंद्र आहे.सन १९६० पासून मराठी भाषेतील विश्वकोषची निर्मिती करण्याचे काम चालू आहे.सन १९७६ मध्ये भारत सरकारकडून 'पद्मभूषण'पुरस्कार प्राप्त आणि सातारा जिल्ह्यातील थोर व्यक्तीमत्व कै.तर्कतीर्थ लक्ष्मनशास्त्री जोशी हे या विश्वकोशचे संपादक होते. सन १९९७ पर्यंत या विश्वकोषाचे १५ खंड प्रकाशित झाले आहेत. भारताच्या संविधानाचे संस्कृतमध्ये रूपांतरण त्यांनीच केले आहे. सन १९६९ मध्ये मॉस्को येथे आयोजित केलेल्या जागतिक धर्म परिषदेसाठी अमेरिका आणि रशियाच्या सरकारकडून त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. महात्मा गांधीजींनी हिंदू धर्मशास्त्रासाठी प्रमुख सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती केली होती.

        या ठिकाणी जवळपास ३७,००० हून अधिक उपयुक्त संदर्भाधीन  पुस्तके असून स्वतंत्र मुद्रणालय सुद्धा उपलब्ध आहे. कै.जोशींच्या पश्चात कै.प्राध्यापक एम.पी.रेघे हे विश्वकोषचे मुख्य होते. सध्या प्राध्यापक आर.जी.जाधव हे अध्यक्ष आहेत.

./../images/WB00939_1.GIF (1387 bytes)