सीमा चिन्हे    ( सातारा जिल्ह्यातील  महत्वाचे प्रकल्प)

./../images/WB00939_1.GIF (1387 bytes)

./../images/khambatki_tunnel.jpg (10689 bytes)   खंबाटकी बोगदा

  • खंबाटकी बोगदा  राष्ट्रीय  महामार्ग क्रमांक -  ४

अतिरिक्त दुहेरी वाहतुकीच्या दृष्टीकोनातून पुणे आणि सातारा या दरम्यान खंबाटकी घाटाची निर्मिती 'बांधा-वापरा-हस्तांतरित करा' या आधारावर आयडीअल रोड बिल्डर लिमिटेड बॉम्बे यांच्यातर्फे करण्यात आली.
काम सुरु केलेची तारीख  २०/०१/१९९९
काम पूर्ण झालेची तारीख २०/०८/२०००
अंदाजित रक्कम   ३२.०० कोटी 
अंतिम खर्च र.रुपये  ४०.७५ कोटी 
लांबी ८९० मी.
उंची   ७.१५ मी.
रोशनाई  ९२ दिवे,(१५० वॅट)
पथकर दर -२/३ चाकी वाहनासाठी  काही नाही
             ४ चाकी वाहनासाठी १०/- रु.
          बस/ट्रक/टॅंकर  ३०/- रु.
            अवजड वाहनांकरिता ५०/- रु.

 

 

./../images/WB00939_1.GIF (1387 bytes)

./../images/lake_tapping.jpg (13486 bytes) लेकटॅपिंग 

लेक टॅपींग

 पाणी वहन करण्याची प्रणाली तलावाला (लेक) जोडणे या तंत्रज्ञानाला लेकटॅपिंग असे म्हणतात. हे लेकटॅपिंग नैसर्गिक किंवा कृत्रिम असू शकते.  दि.१३/३/१९९९ रोजी कोयना जलाशयात लेकटॅपिंगसाठी केलेला स्फोट होता. हे लेकटॅपिंग फक्त भारतातीलच नव्हे तर संपूर्ण आशियातील पहिले लेकटॅपिंग होय.    

 

 

./../images/WB00939_1.GIF (1387 bytes)

./../images/pchakki1_new1.bmp (59022 bytes) चाळकेवाडीतील टॉवर्स

  • पवन उर्जा प्रकल्प .
 राज्यात जेंव्हा पवन उर्जा निर्माण करणेत येवू शकते असा शोध लागला तेंव्हा रस्त्यांच्या,वाहतुकीच्या,पाण्याच्या दृष्टीकोनातून तसेच सरासरी २५०० फुट उंचीवर सपाट जागा उपलब्ध असणारी सातारा जिल्ह्यातील आदर्श ठिकाणे टॉवर्स उभारणीसाठी शोधण्यात आली. या टॉवर्सकडून निर्माण करण्यात आलेली वीज कोयनेच्या एम.एस.ई.बी.जाळ्याला जोडण्यात आली. इतर सर्व ठिकाणांच्या तुलनेत 'चाळकेवाडी' हे सर्वात उत्तम ठिकाण आहे. सध्या 'इनरकॉन', 'सुझलॉन' आणि 'वेस्टास' या कंपन्या इथे कार्यरत आहेत.
तालुका गांव टॉवर्स वीज (एम.डब्लु.)
सातारा चाळकेवाडी ३६ ८.७७
सातारा ठोसेघर  ८० १८.२६
पाटण वनकुसवडे ४१६ १५१.३५
एकूण   ५३२ १७८.३८ 
 

 

./../images/WB00939_1.GIF (1387 bytes)