kates_point.bmp (68122 bytes)

orther_seat.bmp (66870 bytes)

महाबळेश्वर -

महाराष्ट्राचे काश्मीर .......

./../images/WB00939_1.GIF (1387 bytes)         

महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण आहे. तसेच महाबळेश्वर हे सह्याद्रीच्या पर्वत रांगांवर समुद्र सपाटीपासून सुमारे ४५०० फुट उंचीवर वसलेले आहे.महाबळेश्वरला जुन्या मुंबई प्रांताची उन्हाळ्यातील राजधानी म्हणूनच संबोधले जात होते. येथील  हिरवा निसर्ग, सुंदर बगीचे, उदयाने, श्वास रोखायला लावणारी दृश्ये इत्यादीमुळे पर्यटक मंत्रमुग्ध होतात. ब्रिटीश-कालीन वैभवसंपन्न आणि मनमोहक वाडे, इमारती या आजही त्यावेळच्या ब्रिटीश राजवटीची ओळख करून देतात. मार्च ते जून हा कालावधी महाबळेश्वरला भेट देण्यास योग्य आहे.

येथील प्रेक्षणीय ठिकाणांना 'पॉईंट' म्हणतात. बहुतांशी 'पॉईंट' हे डोंगराच्या टोकालाच आहेत. 

 ./../images/WB00939_1.GIF (1387 bytes)

orther_seat.bmp (66870 bytes)

आर्थर सीट पॉईंट

महाबळेश्वरातील सर्वात प्रसिद्ध  पॉईंट म्हणून ओळखला जातो. या  पॉईंटच्या डावीकडे खोल दरीतून कोंकणात जाणारीसावित्री नदी आहे तर उजवीकडे घनदाट जंगले आहेत  यालाच ब्रम्हारण्य असेही म्हणतात हि सर्व मनमोहक आणि आकर्षक दृश्ये इतर गोष्टींचा विसर पडायला भाग पाडतात. हवामान जर स्वच्छ असेल तर या पॉईंटवरून रायगड किल्ला ,तोरणा किल्ला स्पष्ट दिसतात. याच मार्गावर 'टायगर स्प्रिंग', 'इको पॉईंट', 'एलफिस्टन पॉईंट' आहेत.

 ./../images/WB00939_1.GIF (1387 bytes)

kates_point.bmp (68122 bytes)

ईको पॉईंट

आर्थर पॉईंटच्या मार्गावरच मनमोहक ,आरोग्यदायक आणि नैसर्गिक दृष्टया समृद्ध असा ईको पॉईंट आहे.इथे खोल दऱ्या, उंच पर्वत पहावयास मिळतात.

./../images/WB00939_1.GIF (1387 bytes)

  new_venna_lake.bmp (122814 bytes)

वेण्णा लेक 

सन १८४२ साली,सातारचे राजे श्रीमंत छ.आप्पासाहेब महाराज यांनी 'वेण्णा लेक'ची निर्मिती केली.वेण्णा  लेकचा विस्तार सुमारे २८ एकर क्षेत्रात असून त्याची सरासरी खोली १०फुट आहे.तसेच बारमाही वाहणाऱ्या झऱ्यामुळे येथील उदयाने  व बगीचे फुलले आहेत.यामुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या येथील सौंदर्यात आणखीनच भर टाकली गेली आहे.तलावा भोवतालचा संपूर्ण परिसर झाडे, हिरवळ आणि फुलांनी व्यापलेला आहे. पावसाळ्यानंतर येथे भरपूर पाणी साठा असतो. त्यामुळे या ठिकाणाला भेट देण्याची हीच योग्य वेळ आहे.हे ठिकाण  पाचगणीच्या एस.टी.बस स्थानकापासून सुमारे २ किमी अंतरावर आहे.

 ./../images/WB00939_1.GIF (1387 bytes)

falkland_point.bmp (68122 bytes)

फॉकलंड पॉईंट

येथून खोल दरीमधल्या कोयना नदीचे दर्शन होते.तसेच या ठिकाणाहून मावळत्या सूर्याचे दर्शन त्याच्या सौंदर्यात आणखीनच भर टाकते.

 ./../images/WB00939_1.GIF (1387 bytes)

lingmala.bmp (67550 bytes)

लिंगमळा  वाटर फॉल    

हे सहलीसाठी उत्तम ठिकाण आहे.तसेच हा पॉईंट पांचगणी रस्त्याला वेण्णा लेक पासून अत्यंत जवळ आहे. 

 ./../images/WB00939_1.GIF (1387 bytes)

bby_point.BMP (108054 bytes)

बॉम्बे पॉईंट

हा महाबळेश्वर मधील सर्वात प्रसिद्ध पॉईंटआहे.सर्व पर्यटक इथे मावळत्या सूर्याचे दर्शन घेण्याकरिता येत असतात.यालाच 'सनसेट' पॉईंट असेही संबोधतात.

 ./../images/WB00939_1.GIF (1387 bytes)

./../images/krishnamai_temple.bmp (67170 bytes)

panchnadya.bmp (34686 bytes)

श्रीक्षेत्र महाबळेश्वर 

महाबळेश्वर हे नाव भगवान महादेव (महाबली) यांच्या नावापासूनच प्राप्त झालेले आहे. जुन्या महाबळेश्वर मध्ये महादेवाचे आहे,यालाच क्षेत्र महाबळेश्वर असेही म्हणतात. महाबळेश्वर पासून ५ किमी अंतरावर क्षेत्र महाबळेश्वर आहे.या ठिकाणी अनेक  धार्मिक स्थळे आहेत,तसेच १३ व्या शतकातील सर्वात जुने कृष्णाबाई मंदिर आहे.

./../images/WB00939_1.GIF (1387 bytes)

./../images/WB00939_1.GIF (1387 bytes)