पांचगणीतील स्थळे 

./../images/WB00939_1.GIF (1387 bytes)

     ांचगणी हे महाबळेश्वर पासून जवळ (१८ कि.मी.) अंतरावर असलेले आणखी एक थंड हवेचे ठिकाण आहे. या ठिकाणी सर्व सोयी-सुविधांनी परिपूर्ण असलेल्या निवासी शाळांमुळे हे ठिकाण प्रसिद्धीस आले आहे. पांचगणीला भेट म्हणजे एक सुखद अनुभवच आहे. 

 

    table_land.bmp (49554 bytes)

 

dhom_dam.bmp (58374 bytes)

                धोम धारण       

./../images/parasi_new1.bmp (144954 bytes)    

 पारसी पॉईंट

<< टेबल लँड - हे आशियातील दुसरे सर्वात लांब जवळपास ९२ हेक्टर क्षेत्रात  जांभा खडकावर पसरलेले पठार असून याची उंची सुमारे २०० फुट आहे. या ठिकाणाहून पांचगणी शहराची आणि धोम धरणाची विलोभनीय दृश्ये पाहायला मिळतात.

 

wonder_point.bmp (55782 bytes) << वंडर पॉईंट

 

sidney_point.bmp (32046 bytes) << सिडनी पॉईंट

 

./../images/WB00939_1.GIF (1387 bytes)

pgad_new1.bmp (129942 bytes)

प्रतापगड 
महाबळेश्वर पासून महाड रस्त्याला २७ कि.मी.अंतरावर प्रतापगड आहे. दि.१० नोव्हे.१६५९ रोजी या किल्ल्यावर छ. शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्यात  सर्वात मोठी लढाई झाली होती, त्यामुळे या किल्ल्याला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. सन १९५६ मध्ये शिवाजी महाराजांनी ह्या किल्ल्याची स्थापना केली. समुद्रसपाटीपासून सुमारे ३५४३ फुट उंचीवर हा किल्ला आहे. छ.शिवाजी महाराजांनी' तुळजा-भवानी' मातेचे मंदिर या ठिकाणी  स्थापले होते. या किल्ल्यावरून कोंकणातील शेकडो किलोमीटर क्षेत्राचे दर्शन घडते.

./../images/WB00939_1.GIF (1387 bytes)

./../images/tapola.BMP (110934 bytes)

तापोळा (बोट क्लब)
महाबळेश्वर पासून ३० कि.मी.अंतरावर सहलीसाठी आणि बोटिंग करण्यासाठी सुंदर तापोळा तलाव आहे. हा तलाव कोयना  धरणातील शिवसागर या विशाल जलाशयाचाच शेवटचा हिस्सा आहे.

./../images/WB00939_1.GIF (1387 bytes)