श्री.छत्रपति शिवाजी संग्रहालय(सातारा)

सातारा जिल्हा हा समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेला जिल्हा असून पूर्वी मराठा राज्याची राजधानी म्हणून ओळखला जायचा. इथे सन १८३९ सालापर्यंत छ.शिवाजी महाराजांच्या उत्तराधिकाऱ्यानी राज्य केले. प्रामुख्याने येथील संग्रहालय आणि ऐतिहासिक स्थळे प्रामुख्याने लोकांना प्रेरणादायी वाटतात.सन १९६६ साली या संग्रहालयाच्या उभारणीचा मुहूर्त झाला व सन १९७० साली त्याचे काम पूर्ण झाले.या संग्रहालयाचे उदघाटन श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे भोंसले यांच्या शुभाशीर्वादाने व तत्कालीन गृहमंत्री कै.यशवंतराव चव्हाण यांच्या शुभ हस्ते पार पडला. 

संग्रहालयाची रचना अशा प्रकारें करणेत आली आहे कि यामधून १७ व्या व १८ व्या शतकातील संस्कृतीचे दर्शन घडते.हे संग्रहालय विशेषतः पुढील  दोन विभागामध्ये विभागलेले आहे,प्रदर्शित वस्तु आणि मराठा कला दालन.येथील प्रदर्शित वस्तु प्रामुख्याने पुढील चार भागांमध्ये दिसतात.,

१.शस्त्र विभाग ,२.कोरीव काम  विभाग ,३.चित्रकला दालन आणि ४.वस्त्र दालन .

shivaji_takht.BMP (377262 bytes)

छ.शिवाजी महाराजांचे तख्त (गादी) 

shivaji_waepons2.BMP (432594 bytes)

ढाल,तलवार,शस्त्रास्त्रे आणि शिवाजी महाराजांचे चित्र 

shivaji_weapons3.BMP (276502 bytes)

तलवार,शस्त्रास्त्रे आणि इतर काही लढण्याची  साधने

          chilkhat.bmp (47790 bytes)   

swordset.bmp (42558 bytes)

<< एकदम डावीकडे (चिलखत) लढायीच्या वेळी परिधान करणेचा व खासकरून तलवार हल्ल्यापासून संरक्षणासाठी धातूंनी,विशेषतः लोखंडापासून बनविलेला सदरा .अनेक तलवारींचा समूह,तसेच चांदीच्या म्यानावर स्वर्णाने कोरीव काम केलेली महाराजांची तलवार.काही तलवारी हिऱ्यांनी सजविलेल्या आहेत.

या संग्रहालयात भरपूर शस्त्रास्त्रे,निरनिराळी वस्त्रे पहावयास मिळतात.संग्रहालयातील प्रत्येक वस्तु इतक्या दिवसांपासून आणि अशा प्रकारे जतन केलेली आहे कि ती प्रत्येक वस्तू  छ.शिवाजी महाराज, त्यांचे उत्तराधिकारी या सर्वांचा व मराठा साम्राज्याचा इतिहास सांगतात. अधिक माहितीसाठी संग्रहालयाच्या उप  अभिरक्षकांकडे  संपर्क साधावा. फोन-(०२१६२) २ ३८२३५.
संग्रहालय पाहण्याची वेळ स.१०.०० ते दु.१.०० आणि दु.१.३० ते सायं.५.००  सोमवारी बंद