देवस्थाने आणि तीर्थ यात्रेकरूंसाठी केंद्र (सातारा जिल्हा)

./../images/WB00939_1.GIF (1387 bytes)

 ./../images/ukshwar.jpg (11149 bytes)      

कुरणेश्वर (खिंडीतील गणपती)

 • कुरणेश्वर (खिंडीतील गणपती)                          

सातारा शहरापासून जुन्या सातारा-कोल्हापुर रस्त्याला १ कि.मी. अंतरावर श्री गणेश आणि श्री महादेवांचे मंदिर आहे. खिंडीतील गणपती हा स्वयंभु असून, हे सातारचे पुरातन आणि प्रसिद्ध ग्रामदैवत आहे.

./../images/WB00939_1.GIF (1387 bytes)

./../images/yevat1.bmp (100206 bytes)      

येवतेश्वर  मंदिर 

 • येवतेश्वर  मंदिर
येथे ऎतिहासकालीन श्री महादेवांचे मंदिर आहे. महाशिवरात्रीला आणि श्रावण महिन्यामध्ये भाविक पवित्र मनाने दर्शन घेण्यासाठी येतात.  सातारा शहरालगतच घाट प्रारंभ होतो व पुढे हाच मार्ग येवतेश्वर  मंदिराकडे जातो. सातारा शहरापासून ५ कि.मी.अंतरावर आणि समुद्र सपाटीपासून सुमारे २५०० फुट उंचीवर हे मंदिर आहे. या मंदिरापासून ते कास पर्यंत पसरलेल्या हिरव्यागार झाडा-झुडपांमुळे हे ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून विकसित झाले आहे.

./../images/WB00939_1.GIF (1387 bytes)


      

 

 


 

      • महा गणपती, वाई
वाई (भारताची दक्षिण काशी) ते सातारा हे अंतर साधारणपणे ३३ कि.मी.आहे. वाई खासकरून येथे असणाऱ्या मंदिरांमुळे आणि घाटामुळे प्रसिद्ध झाले आहे. संपूर्ण राज्यातून भाविक पवित्र मनाने पूजा-अर्चना करण्यासाठी येथील महा गणपतीच्या मंदिरामध्ये येत असतात. हे महाराष्ट्रातील अतिशय महत्वाचे तीर्थक्षेत्र आणि सांस्कृतीक केंद्र आहे. मराठी विश्वकोषचे केंद्र येथे आहे. वाईपासून ९ कि.मी.अंतरावर कृष्णा नदीवर बांधलेले धोम धरण  आहे.  ./../images/shikhar.bmp (202614 bytes)        शिखर शिंगणापूर मंदिर

 • शिखर शिंगणापूर 
सातारा शहरापासून  ८९ कि.मी.अंतरावर सातारा-अकलूज रस्त्याला श्री महादेवांचे फार प्राचीन मंदिर आहे यालाच शिखर शिंगणापूर म्हणतात. प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीला भक्त मोठ्या संख्येने इथे जमतात. या मंदिराला छ. शिवाजी महाराजांनी  भेट दिली होती असे खुप ऎतिहासिक संदर्भ आहेत. 

 

./../images/WB00939_1.GIF (1387 bytes)

  ./../images/mhaswad_temple.bmp (116694 bytes)        सिद्धनाथ मंदिर

 • सिद्धनाथ मंदिर -म्हसवड 
हे सिद्धनाथ मंदिर १२ व्या शतकात स्थापन केलेले आहे. शंकर आणि पार्वती यांच्या रुपातील सिद्धनाथ आणि जोगुबाई यांच्या मूर्ती इथे आहेत.भेट देण्यासारखे हे मंदिर म्हसवड येथे सातारा शहरापासून सातारा-सोलापूर रस्त्याला ८० कि.मी. अंतरावर आहे. लाखोंच्या संख्येने भाविक इथे जमतात व वार्षिक रथयात्रेचे आयोजन करतात.

 

./../images/WB00939_1.GIF (1387 bytes)

./../images/chaphal.bmp (88254 bytes) श्री.राम मंदिर

 • चाफळ
चाफळ हे सातारा शहरापासून ३५ कि.मी. तर उंब्रजपासून १५ कि.मी.अंतरावर (पुणे-बेंगलोर रा.म.मार्ग) आहे. समर्थ रामदास स्वामींनी भगवान श्री.रामचंद्रांना दैवत मानून चाफळ येथे अंगापूर जवळील नदीवर श्री राम मंदिर मंदिराची स्थापना केली. हे मंदिर वास्तुकलेचे उत्तम उदाहरण असून पुर्णतः संगमरवरने बांधलेले आहे.     

./../images/WB00939_1.GIF (1387 bytes)

./../images/yamai_temple_new1.bmp (64038 bytes)./../images/yamai.jpg
        (10350 bytes)     यमाई देवी मंदिर              
 • औंध 

औंध हे सातारा शहरापासून ३० कि.मी. अंतरावर आहे. पुर्वी औंध हे औंध संस्थानची राजधानी होती. येथील श्री यमाई देवी मंदिर आणि संग्रहालय प्रसिद्ध आहेत. येथील संग्रहालयात सुमारे ८००० हून अधिक मौल्यवान वस्तू आहेत. 

 

./../images/WB00939_1.GIF (1387 bytes)

./../images/karad_masjid.BMP (76914 bytes)   

कराडमधील ऎतिहासिक मशीद  

 • कराड येथील मस्जिद आणि मनोरे 
सन १५८० मध्ये विजापूरचा इब्राहिम खान उर्फ सुलतान अली आदिल शाह याने मशिदीची स्थापना केली. कित्येक मैलावरून  साधारण ३२.३ मीटर उंचीच्या मिनारांचे दर्शन होते. 

 

./../images/WB00939_1.GIF (1387 bytes)

इतर धार्मिक केंद्रे

१. प्रतापगडावरील भवानी मंदिर :-महाबळेश्वर पासून २७ कि.मी. अंतरावर प्रतापगड आहे. छ.शिवाजी महाराजांनी या ठिकाणी  भवानी मातेचे पवित्र मंदिर स्थापले.

२. पालीचे-खंडोबा मंदिर :- सातारा शहरापासून पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून ३६ कि.मी.अंतरावर आहे.

३. गोंदवले बुद्रुक (महाराजांचे गोंदवले):- सातारा शहरापासून ७२ कि.मी.अंतरावर सातारा-सोलापूर रस्त्याला गोंदवले बु.आहे. या ठिकाणी भगवान श्री.राम आणि यांचे मंदिर व ब्रम्ह्चैतन्य गोंदवलेकर महाराज (१८४५-१९१८) यांची समाधी आहे. प्रत्येक वर्षी मार्गशिर्ष महिन्यात हजारोंच्या संख्येने भक्त इथे जमतात आणि ब्रम्ह्चैतन्य गोंदवलेकर महाराजांची पुण्यतिथी साजरी करतात.

४. सेवागिरी महाराज मंदिर -पुसेगाव :- सातारा शहरापासून ३५ कि.मी.अंतरावर सातारा-सोलापूर  रस्त्याला हे ठिकाण आहे. भेट देण्यासाठी योग्य ठिकाण आहे.

५. खातगुन:-प्रत्येक वर्षी मार्च महिन्यामध्ये सर्व धर्मीय भाविक इथे जमतात आणि पीर साहेबांचा उरुस मोठ्या भक्तिभावाने साजरा करतात. हे राष्ट्रीय एकात्मतेचे एक उत्तम उदाहरण आहे. सातारा शहरापासून ४५ कि.मी.अंतरावर तर पुसेगाव पासून जवळ येरळा नदीच्या काठावर हे ठिकाण आहे.

गोपाळनाथ महाराज (त्रिपुटी) :- सातारा-सोलापूर रस्त्याला सातारा शहरापासून ११ कि.मी. अंतरावर असून येथे संत गोपाळनाथ महाराज यांची समाधी आहे. या ठिकाणाच्या शेजारी तलाव आहे.


./../images/WB00939_1.GIF (1387 bytes)